आयटीआय विद्यार्थ्यांना बॅकलॉगच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील () विविध अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षार्थींची परीक्षा अद्याप झालेली नाही. २०१७ व २०१८ शैक्षणिक वर्षात प्रवेशित हे विद्यार्थी आहेत. परीक्षाच नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. करोनामुळे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबल्या त्यासह परीक्षांचे वेळापत्रकही लांबले. आयटीआयमध्ये विविध ट्रेडला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या २०२०मधील परीक्षा मार्च-२०२१मध्ये घेण्यात आल्या. त्याचा निकाल अद्याप जाहीर नाही. त्यासह २०१७ व २०१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या मुळ परीक्षा झाल्या, परंतु बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. एक, दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन दोन, तीन वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु वेळापत्रक जाहीर नसल्याने विद्यार्थी गोंधळले आहेत. मुळ परीक्षा झाली परंतु काही विद्यार्थ्यांचे एक-दोन विषय राहिले, काहींचे प्रात्यक्षिक अपूर्ण आहे. अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने या विद्यार्थ्यांना नोकरीची संधीही मिळत नाही. २०१९ व २०२०मधील नियमित विद्यार्थ्यांची फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा झाली. त्यानंतर या परीक्षा होणार होत्या परंतु करोनाचा प्रादुर्भाव वाढला आणी परीक्षा लांबल्या. परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्याने दोन्ही वर्षाच्या बॅकलॉग ऑफलाइनच घेण्यात येतील असे सांगण्यात येते. विद्यार्थी आयटीआय प्राचार्यांकडे परीक्षांबाबत चौकशी करीत आहेत, परंतु निश्चित वेळापत्रक नसल्याचे सांगण्यात येते. निकालही लांबणार करोनामुळे आयटीआयच्या प्रात्यक्षिक परीक्षांसह नियमित परीक्षा लांबल्या. आयटीआयमधील दोन वर्ष कालावधीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने त्यानंतर मार्चमध्ये परीक्षा घेतल्या. आयटीआयमध्ये एकवर्षासह दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांची संख्या मोठी आहे. बहुतांशी अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर आहे. प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगसह इतर विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नाही. त्यामुळेही नियमित परीक्षांना विलंब झाला. या परीक्षांचे निकालाबाबत अद्याप स्पष्टता नाही. निकालाची प्रक्रियाही लांबण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. करोनामुळे नियमित परीक्षांना विलंब झाला. मार्चमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. पुनर्परीक्षार्थींच्या परीक्षांचे वेळापत्रक आलेले नाही. ते लवकर येण्याची शक्यता आहे. अभिजित आल्टे प्राचार्य, शासकीय आयटीआय, औरंगाबाद.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ezwSMo
via IFTTT

Post a Comment

0 Comments