Also visit www.atgnews.com
नौदलात नाविक पदाच्या २५०० रिक्त जागांवर बंपर भरती
Indian Navy Navik Recruitment 2021: विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना सरकारी नोकरी (Govt Job) मिळवण्याची संधी आहे. भारतीय नौदल (Indian Navy) ने नाविक पदांवर बंपर व्हेकेंसी (Navy Sailor Vacancy) निघाली आहे. या पदांवर मासिक ६९ हजार रुपये पे-स्केलनुसार वेतन मिळेल. पदांची माहिती अप्रेंटिससाठी नाविक (Sailor AA) - ५०० पदे सेकंडरी रिक्रूटसाठी नाविक (Sailor SSR) - २००० पदे एकूण पदांची संख्या - २५०० पे स्केल - २१,७०० रुपयांपासून ते ६९,१०० रुपये प्रति महिना पर्यंत शैक्षणिक पात्रता भारत सरकार / राज्य सरकार द्वारा मान्यता प्राप्त स्कूल/बोर्डातून बारावी उत्तीर्ण आवश्यक. बारावी मॅथ्स, फिजिक्सचा अभ्यास आवश्यक. सोबतच केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समधील कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा. वयोमर्यादा भारतीय नौदल नाविक व्हेकन्सी 2021 साठी असे उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांचा जन्म १ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ या दरम्यानचा असेल. अर्ज कसा करायचा? इंडियन नेव्हीची वेबसाइट joinindiannavy.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २६ एप्रिल २०२१ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२१ आहे. जनरल आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना २१५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज नि:शुल्क आहे. निवड प्रक्रिया या पदांवरील निवड लेखी परीक्षा, फिजिकल फिटनेस टेस्ट आणि मेडिकल चाचणीच्या आधारे केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dAzDxx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments