Also visit www.atgnews.com
पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा जाहीर
म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले ाने पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचे वर्ष वाया जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाकडून नुकत्याच राज्यशास्त्र विभाग, डिफेन्स स्टडीज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याप्रमाणेच मे महिन्यामध्ये विद्यापीठातील प्रत्येक विभागाशी संलग्न असलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा देता येणार आहेत. गेल्या वर्षीही करोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यापीठाला या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्या लागल्या होत्या. तेव्हा पहिल्यांदाच ऑनलाइ परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यंदा परीक्षांपूर्वी विद्यापीठाने सराव परीक्षा घेतल्या होत्या. याच काळात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने परीक्षांच्या कालावधीबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता परीक्षांची वेळापत्रके जाहीर व्हायला सुरुवात झाल्याने हा संभ्रम दूर झाला आहे. विद्यार्थ्यांना 'मुडल' या ऑनलाइन प्रणालीद्वारे परीक्षा देता येणार असून, परीक्षांचा कालावधी एक ते दोन तासांचा असणार आहे. बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. परफॉर्मिंग आर्ट्सच्या परीक्षांचे काय? विद्यापीठात असलेल्या आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये नृत्य, संगीत, गायन, वादन, नाट्य अशा अनेक परफॉर्मिंग आर्ट्सचे पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे अधिकाधिक मूल्यमापन सादरीकरणावर अवलंबून असते. अशा कोर्सेसचे काय होणार, त्याच्या परीक्षा कशा घेणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतरच या परीक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेवटच्या वर्षाच्या कोणत्याही विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. सर्व विभागांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणार आहोत. विद्यार्थ्यांना याच वर्षी पदव्युत्तर पदवी मिळेल, यावर विद्यापीठ प्रशासन ठाम आहे. सराव परीक्षांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास कोणतीही अडचण येईल, असे वाटत नाही. - महेश काकडे, परीक्षा नियंत्रक,
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eFxFvj
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments