Also visit www.atgnews.com
ICWAI तर्फे ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅम; २० कंपन्या होणार सहभागी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्कस् अकाउंटन्ट ऑफ इंडियामार्फत () ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅमचे आयोजन केले आहे. डिसेंबर २०२० मध्ये '' झालेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम आहे. कोलकता, मुबंई, चेन्नई, दिल्ली या देशातील चार केंद्रांच्या माध्यमातून मुलाखतींचे आयोजन केले असून, मे महिन्यापासून त्यास सुरुवात होणार आहे. विविध क्षेत्रातील जवळपास २० कंपन्या या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होणार असून, १ मे ते १२ मेदरम्यान या चार केंद्रांमार्फत हे इटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. यासाठीचे वेळापत्रक 'आयसीडब्लूएआय'मार्फत जाहीर करण्यात आले आहे. इंटरव्ह्यूची वेळ, संबंधित कंपन्यांची माहिती, पात्रतेचे निकष व कामाचे स्वरूप यांची सविस्तर माहिती यासाठीचे वेळापत्रक 'आयसीडब्लूएआय'मार्फत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. काही कंपन्यांमार्फत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत, तर काहींमार्फत ऑनलाइन लेखी परीक्षा, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि शेवटी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. हे सर्व कॅम्पस इंटरव्ह्यू ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार आहे. उमेदवारांना कोणत्याही ठिकाणाहून किंवा घरबसल्या हे इंटरव्ह्यू देता येणार आहेत. तसेच इंटरव्ह्यूची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंपनीमार्फत निवड झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. उमेदवारांना मार्गदर्शन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी 'आयसीडब्लूएआय'मार्फत १३ ते २४ एप्रिलदरम्यान ऑनलाइन प्री प्लेसमेंट मार्गदर्शन सत्र घेण्यात आले होते. सॉफ्ट स्किल, ग्रुप डिस्कशन, यासह संबंधित अनेक तांत्रिक बाबींवर यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nw1um1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments