Also visit www.atgnews.com
SET Result 2021: महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर
MH SET 2020 Result: महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा (Maharashtra State Eligibility Test, SET) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University ) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर निकालाची घोषणा केली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला निकाल वर पाहू शकतात. विद्यापीठाद्वारे जारी केलेल्या परिपत्रकानुसार, परीक्षेत एकूण ६१,११४ उमेदवार उपस्थित होते, यापैकी ४,११४ उमेदवार SET परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ६.७३ टक्के आहे. पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी २७ डिसेंबर २०२० रोजी सेट परीक्षा घेण्यात आली होती. कसा पाहाल निकाल? महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालयाची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/ILElaz वर जा. या नंतर MH SET निकालाच्या लिंक वर क्लिक करा. यानंतर नवी विंडो स्क्रीन पर दिसेल. यानंतर ड्रॉप डाउन मधून MH SET परीक्षेची तारीख निवडा. यानंतर आवश्यक ती माहिती भरून सबमीट करा आणि निकाल डाऊनलोड करा. पात्र उमेदवारांना ई-प्रमाणपत्र १९ एप्रिलपासून डाउनलोड करता येणार आहे. परीक्षेची उत्तर तालिका अंतिम असून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार त्याबाबत कोणतीही तक्रार नोंदवता येणार नाही. या निकालाबाबत अधिक माहिती आणि सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dInHZD
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments