SSC सिलेक्शन पोस्ट एक्झाम 2020 फायनल आन्सर-की जारी

Selection Posts Exam 2020: कर्मचारी निवड आयोगाने, एसएससी (Staff Selection Commission, SSC) एसएससी सिलेक्शन पोस्ट एक्झाम 2020 फायनल आन्सर-की (SSC Selection Posts Exam 2020 Final Answer Key) जारी केली आहे. आयोगाने आन्सर-कीसह प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइट वर अपलोड केली आहे. जे उमेदवार आन्सर की ची वाट पाहत होते, ते आता अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला स्कोर चेक करू शकतात. या व्यतिरिक्त प्रश्नपत्रिकादेखील डाऊनलोड करू शकतात. उमेदवार पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून निकाल पाहू शकतात. एसएससी सिलेक्शन पोस्ट एक्झाम 2020 फाइनल आन्सर-की पाहण्यासाठी सर्वात आधी उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा. यानंतर होमपेज वर फेज - VIII / 2020 सिलेक्शन पोस्ट परीक्षांसाठी लिंक वर क्लिक करा. (मॅट्रिक्युलेशन, हायर सेकंडरी आणि ग्रॅज्युएट आणि त्यानंतरच्या स्तरासाठी) प्रश्नपत्रिकेसह फायनल आन्सर-की अपलोड लिंक वर क्लिक करा. यानंतर उघडणाऱ्या नव्या विंडो वर, आपला रोल नंबर आणि पासवर्ड आदी माहिती भरा. यानंतर समोर फायनल आन्सर-की दिसू लागेल. स्टाफ सिलेक्शन कमिशनने १२ एप्रिल, २०२१ मॅट्रिक, हायर सेकेंडरी आणि पदवी आणि त्यानंतरच्या लेव्हलसाठी SSC परीक्षांचा निकाल जारी केला होता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vuQvfu
via IFTTT

Post a Comment

0 Comments