UPSC CMS Exam: कधी सुरू होणार अर्ज; या दिवशी जाहीर होणार परीक्षेची माहिती

CMS Examकंबाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा २०२१ चे आयोजन २९ ऑगस्ट रोजी आयोजित केली जाणार आहे. जे उमेदवार या परीक्षेत सहभागी होऊ इच्छितात त्यांनी या वृत्ताकडे लक्ष द्यावे. येत्या ५ मे २०२१ रोजी परीक्षेसंबंधीची तपशीलवार माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग जारी करणार आहे. अर्ज प्रक्रिया २५ मे २०२१ पासून सुरू होणार आहे. उमेदवारांची निवड संगणकीकृत परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे केली जाईल. कॉम्प्युटर आधारित परीक्षेत दोन पेपर असतील. हे पेपर प्रत्येकी २५० गुणांचे असणार आहेत, तर व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी एकूण १०० गुण असतील. अर्ज जमा केल्यानंतर उमेदवारांना परीक्षेसाठी उपस्थित राहायचे नसेल तर अर्ज मागे घेण्याची विनंती करावी लागेल. मागील वर्षी एकूण ५५९ जागांसाठी भरती झाली होती. तत्पूर्वी एकूण ९६२ जागांसाठी भरती झाली होती. शैक्षणिक पात्रता यूपीएससी सीएमएस पदांसाठी उमदेवारांकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. या परीक्षेत एमबीबीएसचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात. वयोमर्यादा उमेदारांचे कमाल वय ३२ वर्षे असणे अनिवार्य आहे. त्यावरील वयाच्या उमेदवारांना या परीक्षा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32ZsLUB
via IFTTT

Post a Comment

0 Comments