Also visit www.atgnews.com
UPSC: करोनामुळे IES, ISS आणि IAS इंटरव्यूसह अनेक परीक्षा लांबणीवर
UPSC Exam: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) देशात COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या अनेक परीक्षा स्थगित केल्या आहेत. आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रोजगार भविष्य निधी संघटना (EPFO) परीक्षा 2020, सिविल सेवा परीक्षा (CSE) 2020 इंटरव्यू, आणि अन्य अनेक भरती परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. आयोगाने तूर्त परीक्षा आणि मुलाखती आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीएससीने कोणकोणत्या परीक्षा रद्द आणि स्थगित केल्या आहेत पाहू - UPSC EPFO परीक्षा स्थगित नोटिफिकेशन असे म्हटले आहे की UPSC EPFO लेखी परीक्षा 2020 आधी ९ मे रोजी आयोजित होणार होती, पण तूर्त ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. UPSC IES आणि ISS परीक्षा स्थगित भारतीय आर्थिक सेवा (IES) या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेच्या (ISS) 2020 मुलाखती २० ते २३ एप्रिल रोजी होणार होत्या, त्या पुढील आदेशांपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. UPSC 2020 IAS Interview UPSC ने IAS परीक्षा 2020 मुलाखत प्रक्रिया लांबणीवर टाकली आहे. UPSC इंटरव्यू २६ एप्रिल ते १८ जून या कालावधीत होणार होते. सुधारित तारखा आयोगन नंतर जारी करणार आहे. सुधारित वेळापत्रक कुठे पाहाल? यूपीएससी आपल्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर रिवाइज्ड शेड्यूल जारी करणार आहे. आयोगाने हे स्पष्ट केलं आहे की उमेदवारांना परीक्षेच्या किमान १५ दिवस आधी नवं वेळापत्रक दिलं जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gEFXX3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments