AIIMS INI CET 2021 चे नवे वेळापत्रक जाहीर

New Date and Admit Card: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस () ने पदव्युत्तर मेडिकल कोर्समध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या 'आयएनआय सीईटी २०२१' चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स कम्बाईंड एन्ट्रन्स टेस्ट (INI CET)आता १६ जून २०२१ ला ऑनलाइन होणार आहे. 'एम्स आयएनआय सीईटी २०२१' ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना संस्थेची अधिकृत वेबसाइटवर (AIIMS) म्हणजे aiimsexams.ac.in वर जाऊन वेळापत्रक मिळू शकते. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र ९ जून २०२१ ला मिळण्याची शक्यता आहे. अधिकृत नोटीस करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एम्सने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. जुलै २०२१ च्या सत्रात पीजी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी आयएनआय वैकल्पिक परीक्षा २०२१ साठी नवीन वेळापत्रक तयार केले आहे. AIIMS INI-CET Schedule 2021: या तारखांवर लक्ष ठेवा अर्ज भरण्याची शेवटची तारीख: २ जून २०२१ प्रवेशपत्र देण्याची तारीखः ९ जून २०२१ INI वैकल्पिक परीक्षेची तारीखः १६ जून २०२१ INI वैकल्पिक परीक्षा २०२१ काय आहे ? एम्समध्ये एमडी, एमएस, डीएम (६ वर्षे), एमसीएच आणि एमडीएस सारख्या पदव्युत्तर वैद्यकीय कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी इंस्टीट्यूट ऑफ नॅशनल इंपोर्टंस कम्बाईंड एंट्रंस टेस्ट((INI CET)होते. जे उमेदवार 'आयएनआय सीईटी २०२१' मध्ये पात्र ठरतात त्यांना एम्समध्ये शिकण्याची संधी मिळते. करोनामुळे वेळापत्रकात बदल याआधी INI CET 2021 परीक्षा ८ मे २०२१ रोजी होणार होती. नंतर कोरोना प्रादुर्भावामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)ने करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विविध अभ्यासक्रमांची व्यावसायिक परीक्षा आणि प्रवेश परीक्षा पुढे ढकलली. या संदर्भात aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत माहिती मिळू शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yKy0pH
via IFTTT

Post a Comment

0 Comments