Also visit www.atgnews.com
अकरावी प्रवेशांचा फॉर्म्युला ठरला; कसे होणार प्रवेश जाणून घ्या...
११ वी प्रवेशासाठी दोन तासांची सीईटी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री यांनी दिली. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक प्रवेश परीक्षा होणार असल्याचे त्या म्हणाल्या. १० वी परीक्षा आणि ११ वी प्रवेशांसंदर्भात नुकताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. ११ वी प्रवेशासाठी कसे निकष लावले जातील हे गायकवाड यांनी यावेळी विस्तृतपणे सांगितले. १० वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापन करुन पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यासंदर्भा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत असल्याचे वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या. कोरोनामुळे उद्धवलेल्या परिस्थितीत सर्वमावेशक धोरण तयार करण्यासाठी विभागातील तज्ञ, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी साधारण २४ विविध बैठकांद्वारे चर्चा झाल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. या वर्षीच्या १० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांनी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मुल्यमापन विचारात घेतले आहे. त्या पार्श्वभुमीवर ११ वी प्रवेशात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने वैकल्पिक (Optional) CET घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. ही परीक्षा १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. अकरावी प्रवेश परीक्षा ही ऐच्छिक असणार आहे याबाबत सर्व प्रथम महाराष्ट्र टाइम्सने वृत्त प्रसिद्ध केले होते. कशी असेल परीक्षा? -११ वी प्रवेशासाठी होणारी CET परीक्षा ही १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. - ही परीक्षा १०० गुणांची असणार आहे. - या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. - OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा असेल. अकरावीत प्रवेश कसा मिळणार? - प्रवेश देताना सामाईक प्रवेश परीक्षा देणाऱ्यांना प्राधान्य सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील. - या रिक्त जागांवर १० वीच्या मुल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vv9QO1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments