Also visit www.atgnews.com
केंद्राच्या निर्णयानंतर बारावी परीक्षेबाबतचा निर्णय: राज्य सरकार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'इयत्ता बारावीच्या परीक्षेबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. कारण सीबीएसई व आयसीएसई मंडळांच्या बारावीच्या परीक्षेच्या निमित्ताने हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. केंद्र सरकारनेही अद्याप या मंडळांच्या बारावीच्या परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारचा निर्णय झाल्यानंतर राज्य सरकारही एसएससी मंडळाच्या बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल', अशी भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे. दहावीच्या परीक्षेबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपत असल्याने आणखी दोन आठवड्यांची मुदत देण्याची विनंती करण्यासाठी केलेल्या अर्जात राज्य सरकारने ही भूमिका मांडली. 'दहावीच्या निकालाविषयीचे सूत्र आणि इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी सीईटी चाचणी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) राज्य सरकारने शुक्रवारीच (२८ मे) जारी केले आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालयातील न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप राज्य सरकारला निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे त्याचे भवितव्य व केंद्र सरकारचा संभाव्य निर्णय हे लक्षात घेऊन योग्य पद्धतीने म्हणणे मांडण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत द्यावी', अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे. याविषयी १ जून रोजी सुनावणी अपेक्षित आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fVaP3k
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments