शासनाच्या निर्णयात नेमकेपणाचा अभाव; दहावी मूल्यांकन निकषावरुन सरकारवर टीका

SSC Result, Reaction of petitioner: रद्दच्या ( Cancel) सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणारे याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni) यांनी दहावी मूल्यांकनाच्या शिक्षण विभागाच्या ताज्या निर्णयावर आक्षेप घेतले आहेत. तसेच करोना संपल्यानंतर परीक्षा देऊन आपला स्कोर उत्तम ठेवा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. दहावी परीक्षेसंदर्भातील शासनाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (High court) धाव घेतलेले याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या दहावी मूल्यांकन निकषांवर जोरदार टीका केली आहे. शासनाच्या निर्णयामघ्ये नेमकेपणाचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याची परीस्थिती यातून निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्याला आम्ही योग्य उत्तर देऊ. न्यायालय घेईल तोच निर्णय अंतिम असेल असे सूचक विधानगी कुलकर्णी यांनी केले आहे. शाळेतील तोंडी-लेखी परीक्षा, गृहपाठ आणि नववीचे गुण यांच्या आधारे दहावीला गुण देण्यास शासनाने सांगितले आहे. पण करोना काळात अशा परीक्षा खरंच झाल्या आहेत का हा महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. गृहपाठाचे गुण, तोंडी परीक्षेचे गुण ग्राह्य धरणार असा अंतर्गत मुल्यमापनाचा दावा शासनाने केलाय. पण हे गुण खरंच अस्तित्वात आहेत का, या परीक्षा खरंच झाल्यायत का, असे खोचक प्रश्न कुलकर्णी यांनी राज्य सरकारला विचारले आहेत. याबाबत साशंकता असल्याचे कुलकर्णी म्हणाले. महाराष्ट्र शासनाने दहावी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे नियम, निकष नुकतेच जाहीर केले आहेत. यानुसार दहावी परीक्षेत अंतर्गत मूल्यपापन निकषांच्या आधारे गुण दिले जाणार असून अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक परीक्षा घेतली जाणार आहे. ज्यांना हे मान्य नाही ते करोना संपल्यानंतर दहावीची परीक्षा देऊन पुढे येऊ शकतात असा खुला पर्याय शासनाने ठेवला आहे. मग नंतर परीक्षा घ्यायची तर आधी का नाही, असे कुलकर्णी विचारतात. या सर्वांची उत्तरे शासनाला न्यायालयात द्यावी लागतील. त्यानंतरच हे नियम, निकष अंतिम स्वरुपात मानले जातील असे म्हणत याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी राज्य शासनाला धारेवर धरले. शासनाच्या निर्णयामघ्ये नेमकेपणाचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याची परीस्थिती यातून निर्माण झालीय अशी टीका कुलकर्णी यांनी केली. शासनाने घेतलेला अंतर्गत मुल्यमापन तसेच, वैकल्पिक परीक्षेच्या निर्णयावर धनंजय कुलकर्णी यांनी टीकास्त्र सोडले. शासनाचा आधीच्या मुल्यमापनावर नीट विश्वास नाही अशी टीका त्यांनी केली. या निर्णयावर विद्यार्थी साशंक असतील. ही साशंकता दूर करण्यासाठी करोनानंतर वेगळी परीक्षा शासनाने ठेवली आहे. यामुळे गोंधळ निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले. करोना काळ संपल्यानंतर होणाऱ्या परीक्षेला बसून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक गुण मिळवावेत आणि आपलं शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करावे असे आवाहन त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RUUXpF
via IFTTT

Post a Comment

0 Comments