Also visit www.atgnews.com
GATE 2021: गेटची काऊन्सेलिंग प्रक्रिया लांबणीवर
IIT Delhi: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Indian Institute of Technology IIT, Delhi) ने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग ( Graduate Aptitude Test in Engineering 2021, GATE 2021) साठी काउन्सेलिंग प्रक्रिया तूर्त लांबणीवर टाकली आहे. आता ही प्रक्रिया २८ मे २०२१ पासून सुरू होणार. देशात सध्या कोविड-१९ च्या वाढलेल्या संक्रमणामुळे हा निर्णय घेण्यात आला. या परिस्थितीमुळे काउन्सेलिंग आता थेट पाचव्या राउंटमध्ये सुरू होईल. ही प्रक्रिया व्हर्च्युअल पद्धतीने होईल. या अंतर्गत पहिला राउंड २८ मे रोजी सुरू होईल आणि ३० मे २०२१ रोजी संपेल. दुसरी फेरी ४ जून ते ६ जून २०२१ या कालावधीत होईल. गेट प्रक्रियेतील उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचे आवाहन आयआयटी दिल्लीने केले आहे. काउन्सेलिंग ऑथोरिटी सहभागी संस्थांमधील जागावाटप करतात. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आपले पसंतीक्रम नोंदवायचे असतात. प्रवेश शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरायचे आहे. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा. महत्त्वाच्या तारखा - पहिली फेरी - २८ ते ३० मे २०२१ दुसरी फेरी - ५ जून ते ६ जून २०२१ तिसरी फेरी- ११ जून ते १३ जून २०२१ चौथी फेरी - १८ जून ते २० जून २०२१ पाचवी फेरी - २५ जून ते २७ जून २०२१ COAP 2021: अतिरिक्त फेरीच्या तारखा राउंड A- २ जुलै ते ४ जुलै २०२१ राउंड B- ९ जुलै ते ११ जुलै २०२१ राउंड C- १६ जुलै ते १८ जुलै २०२१ राउंड D- २३ जुलै ते २५ जुलै २०२१ राउंड E- ३० जुलै ते १ ऑगस्ट २०२१ ज्या उमेदवारांनी GATE 2019, 2020, 2021 परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते काउन्सेलिंगसाठी पात्र असतील. याव्यतिरिक्त अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eW91Xm
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments