GATE 2021 ची काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

GATE 2021 counselling: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology या IIT) दिल्लीने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) 2021 काऊन्सेलिंगसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंक अॅक्टिव केली आहे. GATE COAP प्रक्रिया २८ मे पासून सुरू झाली आहे. इंजिनीअरिंग आणि सायन्स पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी GATE काऊन्सेलिंगसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येऊ शकेल. ज्या उमेदवारांनी GATE 2021 ,GATE 2020 आणि GATE 2019 क्वालिफाय केली आहे, ते काऊन्सेलिंगसाठी पात्र आहेत. रजिस्ट्रेशनसाठी उमेदवार ३० मे पर्यंत कॉमन ऑफर अॅक्सेप्टन्स पोर्टल (COAP) coap.iitd.ac.in वर भेट द्यावी. रजिस्ट्रेशनची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे. पाच राउंड मध्ये काऊन्सेलिंग अधिकृत सूचनेनुसार, पहिल्या फेरीचे प्रवेश २८ मे सकाळी १० पासून COAP में उपलब्ध आहेत, त्यासाठी COAP मध्ये लॉग-इन करावे लागेल. गेट काऊन्सेलिंग प्रक्रिया पाच फेऱ्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र जागा रिक्त राहिल्यास सीओएपी (COAP) अधिक राउंड आयोजित करेल. पाच फेऱ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - पहिली फेरी: २८ ते ३० मे २०२१ दूसरी फेरी: ४ ते ६ जून २०२१ तिसरी फेरी: ११ ते १३ जून २०२१ चौथी फेरी: १८ ते २० जून २०२१ पाचवी फेरी: २५ ते २७ जून २०२१ GATE काय आहे? गेट ही परीक्षा इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी असणाऱ्या किंवा इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेद्वारे आयआयटीसह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये एमटेक अभ्यासक्रमांना प्रवेश (MTech Admission) मिळतो. याव्यतिरिक्त सरकारी संस्थादेखील गेट स्कोर (GATE Score) च्या आधारे नोकरी देतात. भारतातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू (IISC) आणि सात आयआयटी (IIT) - मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपुर, खडगपूर, मद्रास आणि रुरकी - यांद्वारे या परीक्षेचे संयुक्त स्वरुपात आयोजन केलं जातं. दरवर्षी एक आयआयटी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडते. चे आयोजन आयआयटी मुंबईने (IIT Bombay) केले होते. गेट २०२२ चे आयोजन आयआयटी खरगपूर करणार आहे. करोनामुळे लांबले काऊन्सेलिंग शेड्युल गेट 2021 ची काऊन्सेलिंग प्रक्रिया १३ मे पासून सुरू होणार होती. मात्र आयआयटी दिल्ली (IIT Delhi) ने करोना व्हायरस (COVID19) च्या पार्श्वभूमीवर काऊन्सेलिंग शेड्यूल लांबणीवर टाकले होते. GATE 2021 काऊन्सेलिंग रजिस्ट्रेशन कसे कराल? अधिकृत वेबसाइट coap.iitd.ac.in च्या होमपेज वर, 'रजिस्ट्रेशन लिंक' वर क्लिक करा. विचारलेली माहिती भरा आणि रजिस्टर करा. यानंतर लॉग-इन करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hYfoN7
via IFTTT

Post a Comment

0 Comments