ICSI CS June Exam 2021 अर्ज भरण्यासाठी आजपासून उघडली विंडो

ICSI CS June Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया () शनिवार १५ मे २०२१ पासून आयसीएसआय सीएस जून परीक्षा २०२१ साठी अर्ज भरण्यासाठी अॅप्लिकेशन विंडो पुन्हा एकदा उघडली जाणार आहे. अशात ज्या उमेदवारांनी आतापर्यंत सीएस फाउंडेशन / एक्झिक्युटिव / प्रोफेशनल प्रोगाम परीक्षांसाठी आपला अर्ज भरला नव्हता, ते आता अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून आपला परीक्षा अर्ज भरू शकतात. उमेदवारांना यासाठी सीएस जून परीक्षा २०२१ परीक्षेचे अर्ज भरण्याच्या आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन लॉगइन करायचे आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख २२ मे २०२१ आहे. उमेदवार पुढील पद्धतीने देखील अर्ज भरू शकतात. ICSI CS June Exam 2021: सीएस जून परीक्षा फॉर्म असा करा सबमीट - सीएस जून परीक्षा फॉर्म जमा करण्यासाठी उमेदवारांना सर्वात आधी आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाइटवर (icsi.edu) जावे लागेल. यानंतर होम पेज वर उपलब्ध ऑनलाइन सर्व्हिस लिंक वर क्लिक करा. यानंतर नवे पेज उघडेल. येथे उमेदवार नोंदणीसंदर्भातील तपशील भरून नोंदणी करू शकतील. यानंतर अर्ज भरून सबमीट करावा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचे प्रिंट आऊट अवश्य घ्यावे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने यासंबंधी एक अधिकृत परिपत्रकही जारी केले आहे. यानुसार, ही सुविधा त्या उमेदवारांसाठी आहे जे सीएस फाउंडेशन / एक्झिक्युटिव / प्रोफेशनल प्रोगाम परीक्षा जून २०२१ साठी आपला अर्ज भरू शकलेले नाहीत आणि ज्यांना परीक्षा देण्याची इच्छा आहे. जे आता २२ मे पर्यंत अर्ज जमा करू शकतील. सीएस जून 2021 सीएस फाउंडेशन / एक्झिक्युटिव / प्रोफेशनल प्रोगाम परीक्षांसाठी ३१ मार्चपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरून घेण्यात आले आहेत. ९ एप्रिल २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3btdP5E
via IFTTT

Post a Comment

0 Comments