Also visit www.atgnews.com
PM मोदी यांची मोठी घोषणा; करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण, १० लाख मदत
PM Cares Fund for orphaned children: यांनी करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. मोफत शिक्षणासह त्या मुलांच्या वयाच्या २३ व्या वर्षी १० लाख रुपये आर्थिक मदतही दिली जाणार आहे. हा सर्व खर्चा पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन फंडातून केला जाणार आहे. करोना महामारी (Corona) मुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठी घोषणा केली आहे. शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भातील ट्विट केले आहे. ते ट्विटमध्ये लिहितात, 'करोनामुळे आपले आई-वडिल गमावलेल्या सर्व मुलांना 'पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रन' योजनेतून मदत केली जाईल. अशा मुलांना त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षीपासून मासिक स्टायपेंड (Monthly Stipend) आणि २३ व्या वर्षी पीएम केअर्समधून १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.' पाच लाखांचा मोफत विमा आणि बिनव्याजी कर्ज पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) मिळालेल्या माहितीनुसार, अनाथ झालेल्या सर्व मुलांना नि:शुल्क शिक्षण दिलं जाईल. ज्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, त्यांना सरकार कर्जासाठी मदत करेल. या कर्जावरील व्याजाची परतफेड पीएम केअर्स फंडातून केली जाईल. याव्यतिरिक्त आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून (Ayushman Bharat Yojana) १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल आणि त्याचा प्रिमीयम देखील पीएम केअर्स फंडाद्वारे भरला जाईल. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fXY8EU
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments