SBI Clerk Recruitment 2021: अर्जांसाठी २० मे पर्यंत मुदतवाढ

Clerk Recruitment 2021: भारतीय स्टेट बँक (SBI) ने एसबीआय क्लर्क भरती (SBI Clerk Recruitment) 2021 साठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय क्लर्क भरती 2021 साठी अर्ज केला नसेल, ते आता २० मे २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जांची मुदत सोमवारी १७ मे २०२१ रोजी संपत होती. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) क्लर्क भरती प्रक्रियेंतर्गत ज्युनियर असोसिएटची एकूण ५२३७ पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक पुढे देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ojnNMc
via IFTTT

Post a Comment

0 Comments