UPSC NDA result 2021 कधी जाहीर होणार... जाणून घ्या संपूर्ण माहिती

NDA Result 2021:केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) (I) आणि (II) परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर करणार आहे. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी देशभरात आयोजित करण्यात आली होती. UPSC च्या कॅलेंडरनुसार, NDA 1 चा निकाल सर्वसाधारणपणे परीक्षा झाल्यानंतर एका महिन्याच्या आत जाहीर केला जातो. जे उमेदवार या परीक्षेला बसले होते ते अधिकृत वेबसाइट वर जाऊन अद्ययावत माहिती पाहू शकतात. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना सेवा भरती बोर्डातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या फेरीला बोलावले जाणार आहे. उमेदवारांनी ध्यान द्यायला हवे की या वर्षी कोविड-१९ च्या वर्तमान स्थितीमुळे एनडीए एनए परीक्षेच्या निकालास काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे. UPSC SSB इंटरव्ह्यू लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीला बोलावले जाणार आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड ही मुलाखतीची फेरी आयोजित करेल. यानंतर योग्य उमदेवारांना त्यांच्या रजिस्टर ईमेल आयडी वर सेंटर आणि इंटरव्ह्यूची तारीख आदी माहिती पाठवण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vE4YpF
via IFTTT

Post a Comment

0 Comments