UPSC Prelims exam 2021: GS I आणि CSAT परीक्षेचा पॅटर्न

केंद्रीय लोकसेवा आयोगाने () नागरी सेवा पूर्व परीक्षा १० ऑक्टोबर पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या पूर्व परीक्षेचा सिलॅबस काय आहे जाणून घेऊया... परीक्षा प्रक्रियेत विलंब झाल्याने उमदेवारांना तयारीसाठी आणखी वेळ मिळाला आहे. सिव्हिल सेवा परीक्षेला तीन भागात विभाजित केले जाते - पूर्व, मुख्य आणि मुलाखत. अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी उमेदवारांना या तिन्ही टप्प्यांत यशस्वी व्हावे लागते. पूर्व परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस पहिल्या टप्प्यात, पूर्व परीक्षेत दोन पेपर असतील. GS I आणि CSAT. सामान्य अध्ययन, स्वातंत्र्योत्तर इतिहास, भूगोल, भारतीय राजकारण, अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान आणि प्रौद्योगिकी आणि अन्य अनेक विषयांचा यात समावेश आहे. सिव्हिल सर्विसेस अॅप्टिट्यूड टेस्ट (CSAT) उमेदवारांसाठी विश्लेषणात्मक आणि योग्यता कौशल्यांचे परीक्षण करण्यासाठी आयोजित केली जाते. यात इंग्रजी, गणित, तर्कशास्त्र आणि विश्लेषणात्मक तर्कावर वर आधारित प्रश्नांचा समावेश असतो. मूल्यांकनासाठी उमेदवारांना दोन्ही पेपरला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. दोन्ही पेपर कमाल २०० गुणांचे आहेत. GS I एक योग्यता-आधारित परीक्षा आहे, CSAT एक योग्यता परीक्षा आहे. उमेदवारांना पासिंग गुण आवश्यक असतात. प्रीलिम्स कट-ऑफ केवल GS I वर आधारित असते. मात्र पूर्व परीक्षेतील गुण अंतिम मेरिट यादीत ग्राह्य धरले जात नाहीत. GS I प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न असतात आणि CSAT पेपरमध्ये बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) स्वरुपाचे ८० प्रश्न असतात. दोन्ही पेपरमध्ये नकारात्मक गुणांकन आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातात. उमेदवारांना पेपरसाठी दोन तासांचा अवधी असतो. परीक्षा स्थगित झाली असल्याने, उमेदवारांना आता चार महिन्यांचा अतिरिक्त वेळ आपली अभ्यासाची रणनिती आखण्यासाठी मिळणार आहे. स्टॅटिक सिलॅबस रिवाइज्ड करण्याव्यतिरिक्त, उमेदवारांना पुढील तीन महिन्यांच्या वर्तमान घटनांवर देखील लक्ष ठेवायला हवे. कोणत्याही विषयाची मूलभत माहिती समजून घेण्यासाठी NCERT च्या पुस्तकांशिवाय पर्याय नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yTuGIP
via IFTTT

Post a Comment

0 Comments