Also visit www.atgnews.com
सुप्रीम कोर्टाने बोर्ड परीक्षांचा निर्णय प्रलंबित ठेवलेल्या राज्यांना दिले निर्देश
Board Exam 2021: बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांनी घेतला असला तरी अनेक राज्यांनी आपल्या राज्यातील बारावी परीक्षांच्या निर्णयाचे भिजत घोंगडे ठेवलेले आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बारावी परीक्षांसंदर्भातील सुनावणीच्या वेळी हा मुद्दा पुढे आला. या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दहावी, बारावीची परीक्षा प्रलंबित ठेवलेल्या सर्व राज्यांना नोटीस जारी केली आहे. सीबीएसई आणि आययीएसई बोर्डाच्या रद्द परीक्षा आणि मूल्यमापन निकषांसंबधी गुरुवारी १७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्या राज्यांनी त्यांच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्या राज्यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील बहुतांश राज्यांनी करोना व्हायरस संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. काहींनी नंतर या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि मूल्यांकनाचे निकष ठरवले. या राज्यांनी आतापर्यंत ठेवलाय निर्णय प्रलंबित ज्या राज्यांनी केवळ बारावीच्या परीक्षा किंवा दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत, पण अद्याप त्या परीक्षांबाबत निर्णय घेतलेला नाही, अशा राज्यांमध्ये पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिशासह १८ राज्यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. दूसरीकडे, सीबीएसई आणि सीआईएससीईने बारावीच्या रद्द परीक्षा आणि मूल्यांकनाचे निकष घोषित केले आहेत. याच आधारे हे बोर्ड निकाल घोषित करणार आहेत. सीबीएसई दहावीचा निकाल २० जुलै आणि बारावीचा निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर केले जाणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gBoP3Z
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments