Also visit www.atgnews.com
शोधगंगा - संशोधनाला ऑनलाइन सहाय्य
आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक लॉकडाउनच्या काळामध्ये महाविद्यालये, विद्यापीठे तसेच ग्रंथालये बंद असल्याने संशोधनाचे कार्य करणाऱ्यांसमोर संदर्भ साहित्याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या विषयात संशोधन करताना, त्या विषयासंबंधी कोणत्या प्रकारचे संशोधन काम झाले आहे किंवा सुरू आहे, हे संशोधन करणारे तज्ज्ञ कोण आहेत, ते कोणत्या संस्था किंवा विद्यापीठांमधून संशोधन करत आहेत याची माहिती महत्त्वपूर्ण असते. विद्यापीठांतील संशोधन प्रबंध हे खूप महत्त्वाचे दस्तावेज असतात. एखाद्या विषयामध्ये चार ते पाच वर्षे संशोधन करून संशोधक आपला प्रबंध सादर करत असतात. हे प्रबंध ज्ञानाचा व माहितीचा उत्तम स्त्रोत असतात. मात्र ग्रंथरुपात असल्याने अनेकदा संबंधित विद्यापीठांमध्ये वा संशोधन संस्थांच्या ग्रंथालयातच पडून असतात. विद्यापीठे व संशोधन संस्थांमधील एमफील व पीएचडीचे प्रबंध (थिसिस) जगभरातील संशोधकांसाठी उपलब्ध व्हावेत यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 'शोधगंगा' हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. 'शोधगंगा' ही देशभरातील प्रबंधांची इलेक्ट्रॉनिक / डिजिटल डिपॉझिटरी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने विनियमाद्वारे (रेग्युलेशन) सर्व विद्यापीठांना एमफील व पीएचडी प्रबंधांची इलेक्ट्रॉनिक प्रत देणे बंधनकारक केले आहे. 'शोधगंगा' या उपक्रमामुळे संशोधकांना माहितीचे व ज्ञानाचे विश्व खुले झाले आहे. लॉकडाउनच्या काळात शोधगंगेद्वारे आपल्या विषयाशी संबंधित विविध संशोधन साहित्याचा अभ्यास करता येईल. https://ift.tt/3bt1ZGd विद्वान जगभरामध्ये संशोधक व त्यांचे संशोधन कार्य यांची माहिती असलेले विविध डेटाबेस उपलब्ध आहेत. अशा प्रकारचा भारतीय संशोधक व त्यांच्या संशोधनाचा डेटाबेस तयार करण्याचा उपक्रम म्हणजे 'विद्वान'. भारतातील अध्यापन आणि संशोधनामध्ये सहभागी असलेल्या विद्यापीठे, महाविद्यालये व संशोधन संस्थांमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिक, संशोधक आणि प्राध्यापकांच्या माहितीचा (प्रोफाइल) विद्वान हा प्रमुख डेटाबेस आहे. याद्वारे तज्ज्ञांची पार्श्वभूमी, संपर्क पत्ता, अनुभव, विद्वत्त (स्कॉलर्ली) प्रकाशने, कौशल्य आणि यश, संशोधक ओळख इत्यादीची महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली जाते. विविध समित्यांसाठी, टास्कफोर्ससाठी तज्ज्ञांच्या पॅनेलची निवड करण्यात हा डेटाबेस महत्त्वाचा ठरतो. मंत्रालये / सरकारी आस्थापनांनी स्थापन केलेल्या आणि मूल्यमापनाच्या उद्देशांसाठी स्थापन केलेल्या टास्कफोर्ससाठी तज्ज्ञांच्या पॅनेलची निवड करण्यात हा डेटाबेस महत्त्वाचा असतो. एखाद्या विशिष्ट विषयातील माहिती हवी असलेल्यांना तज्ज्ञांशी थेट संपर्क साधता येतो. सध्या सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांसाठी संभाव्य सहकारी शोधण्यासाठी मदत होते. वैज्ञानिकांमध्ये/ संशोधकांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि नेटवर्किंगच्या संधी निर्माण करण्यासाठी याची मदत होते. लेख आणि संशोधन प्रस्तावासाठी समवयस्क समीक्षक मिळवण्यासाठी देखील हे उत्तम व्यासपीठ आहे. 'विद्वान'वर पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यावर विशिष्ट नोंदणी क्रमांक दिला जातो. जगभरातील महत्त्वाच्या संशोधकांच्या डेटाबेसशी विद्वान जोडले गेले आहे. आर्किड, गुगुल स्कॉलर, रिसर्चर या संशोधक डेटाबेसशी 'विद्वान'चे इंटिग्रेशन आहे. 'विद्वान'च्या मदतीने संशोधक व प्राध्यापक हे आपल्या विषयातील कौशल्य संशोधक समुदाय, संशोधनासाठी वित्त सहाय्य करणाऱ्या संस्था (फंडिंग एजन्सी), धोरण आखणारे (पॉलिसी मेकर्स) आदींच्या समोर नेऊ शकतात. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात प्राध्यापक 'विद्वान'वर नोंदणी करून आपले संशोधन कार्य जगासमोर नेऊ शकतात. https://ift.tt/2xmibu8
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d5wKV2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments