Also visit www.atgnews.com
'गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोफत इंटरनेट डेटा द्या'
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाकाळात (corona) अनेकांनी रोजगार गमावला आहे, तर अनेकांची वेतनकपात झाली आहे. नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना यंदा मोफत सिम कार्ड (sim) आणि मोफत डेटा (free ) द्यावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे राज्य संयोजक निरंजन गिरी यांनी केली आहे. यंदाचे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारने व शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब, काबाडकष्ट करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता राज्य सरकारने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी व त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. अनेक विद्यार्थी व पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत. इंटरनेटचीही सुविधा नाही. काहींची इंटरनेट घ्यायची आर्थिक परिस्थिती नाही. अशा अनेक समस्या विद्यार्थी-पालकांना भेडसावत आहेत, असे गिरी यांनी सांगितले. अशा परिस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना-पालकांना १५ जूनपूर्वी मोफत डेटा व मोफत कॉलिंग सिम कार्ड (free calling sim card) शाळेत उपलब्ध करून द्यावे, याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने विनंती केली असल्याचे गिरी यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ijqMTX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments