जियो वैज्ञानिक मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर,'असे' तपासा

Geo Scientist Mains Time Table 2021:केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)ची कम्बाइंड २०२१ मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. युपीएससीने या परीक्षेचे जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांना मुख्य परीक्षेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट पाहू शकता. बातमीखालील लिंकवरुन तुम्ही थेट वेबसाइटवर जाऊ शकता. १७ आणि १८ जुलैला मुख्य परीक्षा होणार आहे. दोन भागांमध्ये ही परीक्षा होईल. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी २ ते संध्याकाळी ५ पर्यंत असेल. उमेदवारांनाअधिकृत वेबसाइटवर पेपर नंबर आणि विषयानुसार तारीख आणि वेळ दिसू शकेल. यूपीएससी जिओ वैज्ञानिक मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश पत्र ३ आठवडे आधी जाहीर केले जाईल. अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन उमेदवार आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता. कोणत्याही नव्या अपडेटची माहिती वेबसाइटवर मिळू शकणार आहे. प्रवेश पत्र असे करा डाऊनलोड मुख्य परीक्षेचे एडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in वर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांच्या ई प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा. आता एक नवे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला कम्बाइंड जिओ वैज्ञानिक मुख्य परीक्षा २०२१ चे प्रवेश पत्र दिसेल. त्या लिंकवर क्लिक करुन ते डाऊनलोड करा. पुन्हा एक नवा टॅब उघडेल. इथे दिलेल्या सूचना वाचा आणि पुढे जा. यानंतर उमेदवाराला नोंदणी क्रमांक, जन्म दिनांक अशी माहिती भरावी लागेल. तुमचे प्रवेश पत्र स्क्रीनवर दिसेल. इथे दिले गेलेली माहिती तपासा आणि डाऊनलोड करण्यासाठी प्रिंट आऊट काढा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35KDdAo
via IFTTT

Post a Comment

0 Comments