CBSE 12th Result 2021:सुप्रीम कोर्टात काय झालं? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

12th Result 2021: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (CBSE)बारावी निकालासंदर्भात माहिती दिली आहे. बारावी विद्यार्थ्यांचे गुण कशा पद्धतीने दिले जातील ? आणि रिझल्ट कसा तयार केला जाणार ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. सीबीएसई बोर्ड (CBSE Board)ने सर्वोच्च न्यायालयात बारावीची मार्किंग स्कीम सादर केली. विद्यार्थ्यांच्या गुणांचे वाटप कसे होणार याची माहिती देण्यात आली. यानुसार सीबीएसई बोर्ड निकाल (CBSE 12th Board reuslt 2021)विद्यार्थ्यांच्या दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांवर ठरणार आहे. सर्व शाळांद्वारे बारावीचे प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट मार्क्स २८ जूनपर्यंत बोर्डाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील. मार्कींग फॉर्मूला जाहीर झाल्यानंतर आता ओव्हरऑनल मूल्यांकन प्रक्रिया सुरू होईल. बोर्ड ३१ जुलै २०२१ पर्यंत बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याचे सुप्रीम कोर्टात सीबीएसईने सांगितले. विद्यार्थ्याचे मूल्यांकन करण्यासाठी त्याचे दहावी, अकरावी आणि बारावीतील बेस्ट तीन विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दहावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज, अकरावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज तर बारावीच्या गुणांसाठी ४० टक्के वेटेज दिले जाणार आहे. यासाठी टर्म परीक्षांच्या पाच पैकी तीन विषयांचे गुण विचारात घेतले जातील. बारावीच्या मूल्यमापनासाठी युनिट, टर्म आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. १ जून २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. 'खूप विचार केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. त्यांच्या आरोग्य आणि भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे' पंतप्रधान म्हणाले. गुणांचा फॉर्मुला आणि रिझल्टची तारीख लवकरच बोर्ड आपल्या वेबसाईटवर cbse.nic.in जाहीर करणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vtHKlf
via IFTTT

Post a Comment

0 Comments