Also visit www.atgnews.com
Curriculum 2022 :शिक्षण क्षेत्रातील सर्व अभ्यासक्रम पुन्हा तयार करा, AICTE अध्यक्षांची मागणी
: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद () चे अध्यक्ष अनिल डी सहस्रबुद्धे यांनी शैक्षणिक-प्रक्रियेतील बदल आणण्यासाठी अभ्यासक्रमात संशोधन करण्याची गरज बोलून दाखविली. अभ्यासक्रम ही एक जीवंत वस्तू आहे. आपण वर्षानुवर्षे या एकाच अभ्यासक्रमावर अवलंबून राहू शकत नाही. जगभरात सुरु असलेल्या शिकणाऱ्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत आपल्याला यावे लागेल असे ते म्हणाले. AICTE च्या अध्यक्षांनी SRM विद्यापीठाने आयोजित केलेल्या ऑनलाईन सम्मेलनात त्यांनी उच्च शिक्षणावर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. सर्व इंजिनिअरींग महाविद्यालयांचा अभ्यासक्रम संशोधनासाठी जाणे अनिवार्य आहे. आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्सच्या अभ्यासक्रमाचेही संशोधन व्हावे असे ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांची इंटर्नीशिप, प्रोजेक्ट आधारित अनुभवात्मक शिक्षणाव्यतिरिक्त फॅकल्टी प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. हे फार महत्वाचे आहे. AICTE ने आठ मॉड्यूल फॅकल्टी सर्टिफिकेशन प्रोग्राम बनवला असल्याचे ते म्हणाले. करोना काळात वर्गातील शिक्षणापासून ऑनलाईन शिक्षणातील बदल आपण पाहतोय. यामुळे शिक्षणावर परिणाम झाला आहे. आपण यामधून निश्चितपणे बाहेर येऊ शकतो. सध्या आपल्याला लवकरात लवकर करोना संकटातून बाहेर पडावे लागेल आणि वर्ग आणि परिसरात परत जावे लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ioIZiH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments