IBPS RRB Recruitment 2021: अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

IBPS Recruitment 2021: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मध्ये आरआरबी ऑफिसर्स (स्केल १, २,) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पस) या पदांवर भरती आहे. यासंदर्भात महत्वाची बातमी आहे. आयबीपीएसने या नोकरीचे नोटीफिकेशन जाहीर केले आहे. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर यासाठी ऑनलाईन करता येणार आहे. आज याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची संधी आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आज २८ जून २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याचे सांगण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात. त्यानंतर, होमपेजमध्ये जाऊन सीआरपी आरआरबी सेक्शनमध्ये जावे लागेल. येथे उपलब्ध असलेल्या लिंकवर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करु शकता. हे करण्यापूर्वी वेबसाईटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. आयबीपीएसने दिलेल्या माहितीनुसार, या पदवीसाठी पहिली परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये होणार आहे. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. ऑफिसर्स स्केल १ (पीओ) ची मुख्य परीक्षेसाठी २५ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. ऑफिस असिस्टंट (क्लार्क) पदासाठी मुख्य परीक्षेचे आयोजन ३ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. ऑफिस स्केल २ आणि ३ साठी परीक्षा २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. आरआरबी ऑफिसर्स (स्केल १, २,३) आणि ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पस) पदांच्या पदवीसाठी इच्छुक असणाऱ्यांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक योग्यतेची विस्तृत माहिती आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता. ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्प्स) पदासाठी वयमर्यादा १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ऑफिसर स्केल १ (असिस्टंट मॅनेजर) साठी १८ वर्षापेक्षा जास्त आणि ३० वर्षापेक्षा कमी, ऑफिस स्केल २ (मॅनेजर) २१ वर्षापेक्षा जास्त आणि ३२ वर्षापेक्षा कमी आणि ऑफिस स्केल ३ (सीनियर मॅनेजर) २१ वर्षे ते ४० वर्षांहून कमी वयाचा कालावधी निश्चित केला गेला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qtnX4K
via IFTTT

Post a Comment

0 Comments