INI CET 2021:AIIMSकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

2021:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) ने इंस्टीट्यूट ऑफ नॅशनल कम्बाइन्ड प्रवेश (INI-CET) जुलै २०२१ साठी नवीन तारखांची घोषणा केली आहे. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ही परीक्षा २२ जुलैला होणार आहे. परीक्षा केंद्राचे शहर निवडण्यासाठी ऑनलाइन नोंदणी २२ जून सकाळी ११ वाजल्यापासून २४ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच उमेदवारांना १५ जुलैपर्यंत आपले प्रवेशपत्र मिळणार आहे. करोनामुळे परीक्षा स्थगित सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार १६ जूनला होणारी आयएनआय सीईटी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता ही परीक्षा २२ जुलैला होणार आहे असे एम्सने आपल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये सांगितले आहे. ओसीआय / परदेशी नागरिकांसाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकाडून मिळणारे "अनापत्ति प्रमाण पत्रा" सोबत अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै संध्याकाळी ५ पर्यंत आहे. तर २६ जुलैला याचा निकाल जाहीर होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SSI3Jh
via IFTTT

Post a Comment

0 Comments