Maharashtra College Admission:पदवीमध्ये प्रवेश कसे होणार ? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

Maharashtra 2021: राज्यात अभियांत्रिकी, फार्मसी आणि आर्किटेक्चर कोर्ससाठी प्रवेश परीक्षेंचे (MHCET 2021) आयोजन जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केले जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी यासंदर्भातील माहिती दिली. महाराष्ट्र ऑनलाईन वैकल्पिक परीक्षेचे (Maha CET) आयोजय करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. नॉन प्रोफेशनल युजी कोर्ससचे प्रवेश बारावीच्या गुणांवर व्हायचे. पण यावर्षी बारावी बोर्डाची परीक्षा झाली नाही. यामध्ये पहिल्या वर्षाचे युजी कोर्सेस बॅचलर ऑफ आर्ट्स (BA admission 2021), बॅचलर ऑफ कॉमर्स (BCom admission 2021), बॅचलर ऑफ सायन्स ( BSc Admission 2021) साठी प्रवेश परीक्षा असेल असे सामंत म्हणाले. सरकरा पर्यायांचा विचार करत आहे. यूजी प्रवेशासाठी एक राज्यस्तरीय, विभाग पातळीवर सीईटी परीक्षा व्हावी असे आम्हाला वाटते. सरकारने यासाठी एक समिती बनवली आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरु, स्टेट सीईटी सेल आणि उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत. ही कमिटी याप्रकरणी रिपोर्ट बनवणार असल्याचेही ते म्हणाले. यावर्षी देखील ऑनलाईन क्लास सध्याची परिस्थिती पाहता या शैक्षणिक वर्षात देखील सर्व प्रोफेशनल कोर्सससाठी ऑनलाईन क्लास सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका असून सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे ऑफलाईन लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल होणार नसल्याचेही ते म्हणाले. फीस नाही जर सीईटी (Maharashtra UG admission CET 2021) झाली, तर विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही. कारण त्यांनी आधीच बारावी परीक्षेच्या बोर्डाची फी भरली आहे. तसेच कॉलेज फीमध्ये सवलत द्यावी या विद्यार्थ्यांच्या मागणीवर फीस रेग्युलेशन अथॉरिटी निर्णय घेईल असेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Rtdl8X
via IFTTT

Post a Comment

0 Comments