NTSE Exam : राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल १० जुलैला होणार जाहीर

NTSE Stage 2 Answer Key 2021: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) नॅशनल टॅलेंट सर्च(एनटीएसई) च्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे स्टेज २ मध्ये पीरक्षेची अंतिम आन्सर की आणि उमेदवारांची ओएमआर प्रत जाहीर केली आहे. परिषदेने एनटीएसई स्टेज २ परीक्षेमध्ये मेंटल एबिलिटी टेस्ट (एमएटी) आणि स्कॉलेस्टिक एबिलिटी टेस्ट (एसएटी) साठी आन्सर की अधिकृत वेबसाईट .nic.in वर जाहीर केली आहे. एनसीईआरटी द्वारे एनटीएसई स्टेज २ च्या परीक्षेचे आयोजन १४ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात आले होते. त्यानंतर, परिषदेने १९ मे २०२१ रोजी एक नोटिस जाहीर केली. त्यानुसार स्टेज २ परीक्षांची अंतिम आन्सर की आणि विद्यार्थ्यांची ओएमआर प्रत १५ जून २०२१ पासून डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्याचे सांगण्यात आले.एनटीएई स्टेज २ रिझल्टची घोषणा १० जुलै २०२१ रोजी केली जाईल असेही सांगण्यात आले. एनटीएसई स्टेज 2 एमटीची फाईनल आन्सर की डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने एनसीईआरटी वेबसाइट ncert.nic.in वर क्लिक करा. यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या एमटी आणि एसएटीशी संबधिंत लिंकवर क्लिक करा. यानंतर संबंधित टेस्टसाठी फायनल आन्सर की पीडीएफ फॉर्मेटमध्ये ओपन होईल. उमेदवार ही पीडीएफ फाईल प्रिंट करु शकतात तसेच याची सॉफ्ट कॉपी सेव्ह देखील करु शकतात. नॅशनल टॅलेंट सर्च ही भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी राष्ट्रीय स्तरावरची विद्यार्थी योजना आहे. मागच्या परीक्षेत ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी या परीक्षेत भाग घेऊ शकतात. ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा राज्यस्तरीय असतो. ज्याचे आयोजन वेगवगेळ्या राज्यातील एनटीएसई संबंधित परीक्षा नियामक बोर्ड किंवा प्राधिकरणाद्वारे केले जाते. पहिल्या टप्प्यात पास झालेले विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यात स्टेज २ च्या परीक्षेला बसतात. दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) द्वारे परीक्षा घेतली जाते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3guOY4l
via IFTTT

Post a Comment

0 Comments