Also visit www.atgnews.com
विद्यार्थी-पालकांच्या बैठकीत अचानक सहभागी झाले PM मोदी आणि....
PM Modi Participate in : गुरुवारी CBSE च्या बारावीचे विद्यार्थी आणि पालकांची ऑनलाईन बैठक झाली. बारावीची रद्द झालेली परीक्षा तसेच पुढच्या वर्गात प्रवेश देताना करण्यात येणारे मूल्यांकन अशा विविध मुद्दयांवर चर्चा सुरु होती. या मिटींगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM ) अचानक सहभागी झाले. यानंतर त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी पंतप्रधान मोदींना परीक्षेसंदर्भात प्रश्न विचारले आणि त्यावर चर्चा केली. बारावीच्या परीक्षा आणि मुल्यांकन निकषांवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांसाठी CBSE ने ही बैठक बोलावली होती. याआधी करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बारावीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. अनेक राज्य सरकार आणि महत्वाच्या व्यक्तींच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या प्रादुर्भावात विद्यार्थ्यांना धोका पोहोचू नये, त्यामुळे प्रत्यक्षातील परीक्षांऐवजी पर्यायी मार्ग अवलंबला जावा यावर सर्वांचे एकमत झाले. बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल योग्य निकषांच्या आधारे वेळेत तयार केले जावेत अशा सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CBSE च्या अधिकाऱ्यांना केल्या. पंतप्रधानांनी अनेक राज्यांतील शिक्षण मंत्र्यांसह केंद्रीय राजनाथ सिंह यांच्यासमवेत बैठक केली होती. यावेळी भाजपशासित राज्यांनी परीक्षा व्हावी असे म्हटले होते. तर काँग्रेसशासित राज्यात परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RiTQQd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments