Also visit www.atgnews.com
UPSC ESE Prelims Admit Card 2021: इंजिनीअरिंग सर्विस परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
UPSC Recruitment Admit Card 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission या UPSC) इंजिनीअरिंग सर्विस एक्झाम (UPSC ESE) 2021 ईएसई प्रीलिम्स अॅडमिट कार्ड 2021 जारी केले आहेत. जे उमेदवार इंजिनीअरिंग सर्विस परीक्षेसाठी उपस्थित राहणार आहेत, त्यांनी यूपीएससीच्या अधिकृत साइट upsc.gov.in च्या माध्यमातून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. प्रवेशपत्र २४ जून ते १८ जुलै 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल. शेवटच्या क्षणी होणारी घाई आणि तांत्रिक समस्या टाळण्यासाठी उमेदवारांना ई-प्रवेश पत्रकाचे प्रिंटआउट आधीपासूनच घ्यावे. यूपीएससी अभियांत्रिकी सेवा प्रिलिम्सची परीक्षा १८ जुलै २०२१ रोजी देशभरात घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने आपले अॅडमिट कार्ड डाउनलोड करावे. शिवाय अॅडमिट कार्ड डाऊनलोडचा थेट लिंकही खाली दिलेली आहे. UPSC ESE Prelims Admit Card 2021: कसे कराल डाऊनलोड? १: यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. २: होमपेज वर उपलब्ध यूपीएससी ईएसई प्रीलिम्स अॅडमिट कार्ड 2021 लिंक वर क्लिक करा. ३: एक नवं पेज उघडेल. तेथे लॉग-इन क्रिडेंशियल देऊन लॉग इन करावे. ४: आता अॅडमिट कार्ड स्क्रीन वर उघडेल. ५: उमेदवार आपले अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतील. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घेऊन ठेवा. अॅडमिट कार्ड सह पुढील आयडी प्रूफ आवश्यक उमदेवारांना परीक्षेस उपस्थित राहण्यासाठी आपल्या ई-एडमिट कार्ड प्रिंट आउटसह फोटो आयडी प्रूफ परीक्षा केंद्रांवर सोबत बाळगणे आवश्यक आहे. जे ओळखपत्र ऑनलाइन अर्जात नोंदवलं आहे, त्यापैकी एक म्हणजेच आधार कार्ड/वोटर कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग, राज्य/केंद्र सरकार द्वारे जारी लायसन्स/अन्य फोटो ओळखपत्रासह सोबत आणणे आवश्यक आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35PXbd4
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments