Also visit www.atgnews.com
AIIMS Recruitment 2021: कन्सल्टंट पदाची भरती, १ लाखांपर्यंत मिळेल पगार
2021: एम्स दिल्लीमध्ये सरकारी नोकरी मिळण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (बेसिल)ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), नवी दिल्लीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिट (पीएमयू)मध्ये कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट पदांच्या भरतीसाठी जाहीरात देण्यात आली आहे. कंपनीने २ जुलै २०२१ ला जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार दोन्ही पदांच्या एकूण ५ जागा रिक्त आहेत. या जागांवर भरती केली जाणार आहे. या पदाची मुदत सुरुवातीला १ वर्षाची असणार आहे. हा कालावधी उमेदवाराचे प्रदर्शन आणि संस्थेची आवश्यकता पाहून वाढवण्यात येणार आहे. बेसिल्स एम्स भरती २०२१ च्या जाहिरातीनुसार नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची तारीख ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २ जुलैला सुरु झाली आहे. १५ जुलै २०२१ ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शुल्क ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. एकाहून अधिक पदांसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्या पदासाठी ५०० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. या पदांसाठी होणार भरती सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (हॉस्पीटल मॅनेजमेंट) सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट मॅनेजमेंट) सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोक्योरमेंट) सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट फायनांशिअल मॅनेजमेंट) सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (आयटी प्रोजेक्ट मॅनेजमेंट) किती मिळेल पगार? कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास ५० हजार रुपये प्रतिमहा पगार मिळेल सिनियर कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास १ लाख रुपये प्रतिमहा पगार मिळेल
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UmvTJ0
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments