पुणे विद्यापीठाचा मारुती सुझुकीशी करार; विद्यार्थ्यांना दोन वर्षांचे 'ऑन द जॉब ट्रेनिंग'

म. टा. प्रतिनिधी, पुणे ऑटोमोबाइल रिटेल क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना कामाची संधी मिळावी, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ' इंडिया लिमिटेड' या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत विद्यापीठात 'बॅचलर ऑफ व्होकेशनल इन रिटेल मॅनेजमेंट' हा अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे मारुती सुझुकीमध्ये कार्यानुभवाची संधी घेता येणार आहे. तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमात एक वर्ष वर्गात प्रशिक्षण दिले जाणार असून, दोन वर्षांचे 'ऑन द जॉब ट्रेनिंग' असणार आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि सावित्रीबाई फुले यांच्यातील सहकार्य करारावर मंगळ‌ारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी मारुती सुझुकीच्या ट्रेनिंग अकादमीचे मनोज अगरवाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. 'बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज इन रिटेल मॅनेजमेंट'च्या अभ्यासक्रमाची आखणी मारुती-सुझुकी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी एकत्रितपणे केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मूल्याधिष्ठित शिक्षण, कामाची संस्कृती, सॉफ्ट स्किल, तसेच भारतीय आणि जपानी कार्यपद्धतींचे शिक्षण देण्यात येणार आहे. ऑटोमोबाइल बाजारपेठेसाठी हा विशेष अभ्यासक्रम असून, बाजारपेठेतील सर्वोत्कृष्ट गोष्टींचा यात समावेश करून, तज्ज्ञांकडून या अभ्यासक्रमात ज्ञान दिले जाणार आहे. एकूण ८० विद्यार्थी असलेली २०२१-२२ची पहिली बॅच ही ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहे. कमवा आणि शिका या तत्त्वावर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी करता करता प्रशिक्षण प्राप्त होणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या, तसेच कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण देण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून आता आम्ही 'बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज इन रिटेल मॅनेजमेंट' अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना बाजारपेठेशी संवाद साधून कामावरच प्रशिक्षण प्राप्त होऊ शकेल. यातून विद्यार्थ्यांना भारतातील ऑटोमोबाइल विक्री क्षेत्रात उत्तम करिअरची संधी प्राप्त होईल. - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BHzzWS
via IFTTT

Post a Comment

0 Comments