विद्यार्थिनीची मुख्यमंत्री केजरीवालांवर अपमानास्पद टीका, ठोठावला ५ हजारांचा दंड

Delhi Student on : आंबेडकर विद्यापीठाच्या एका विद्यार्थीनीने विद्यापीठाच्या ऑनलाइन दीक्षांत सोहळ्यादरम्यान आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यावर अपमानास्पद टीका केली. यामुळे तिच्यावर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी विद्यार्थीनीवरील दंड मागे घ्यावा असे निर्देश दिले आहेत. एमएच्या अंतिम सेमिस्टरची विद्यार्थीनी असलेल्या नेहावर ३० जून रोजी दंड ठोठावण्यात आला होता. आपल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसण्यासाठी तिला हा दंड भरावा लागला होता. ऑनलाइन दीक्षांत सोहळ्यादरम्यान तिने AUD च्या प्रवेश नीतीच्या विरोधात युट्यूबवर लाइव्ह स्ट्रीमिंग लिंकवर अपमानास्पद पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये शुल्क वाढ आणि अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांविरोधात भेदभाव दिसून आला. पण प्रॉक्टरने दिलेल्या आदेशानुसार यामध्ये अपमानास्पद वाक्यांचा उल्लेख आहे. तिथे ऑनलाइन विरोध करणारे अनेक विद्यार्थी होते पण मलाच दंड ठोठावण्यात आल्याचे विद्यार्थीनीचे म्हणणे आहे. दंड नको, कारवाईही नको मनिष सिसोदिया यांनी दिल्ली उच्च शिक्षण विभागाचे प्रमुख सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आणि त्या विद्यार्थीनीवर कोणती कारवाई होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा दंड देखील लागू नये असे निर्देश दिले. आपल्या देशाच्या सामाजिक व्यवस्थेला संविधानिक मूल्यांविरोधात विधान नसेल आणि सरकार किंवा विद्यापीठापेक्षा वेगळा दृष्टीकोन व्यक्त करण्याबद्दल कोणत्याही विद्यार्थ्यांविरोधात कारवाई होऊ नये असे सिसोदिया म्हणाले. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार विद्यार्थिनी सरकारविरोधात आपले विचार व्यक्त करत होती. त्यामुळे तिच्याविरोधात कारवाई सुरु करण्याआधी हा विषय आमच्यापर्यंत पोहोचायला हवा होता असेही ते म्हणाले. सिसोदियांनी दिला अभिव्यक्तीचा धडा सिसोदिया यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांबद्दल लिहिले. कोणत्याही विद्यार्थ्यास विद्यापीठ परिसरात आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केल्याप्रकरणी दंड ठोठावता कामा नये. विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य आहेत. आपण जर त्यांना वेगळ मत मांडणे, टीका करणे, आवाज विकसित करण्याची संधी देत नसू तर आपण आपल्या देशाला अंधकारमय भविष्यासाठी तयार करतोय असे ते म्हणाले. अशाने लोकांना अन्यायाविरोधात उभे राहण्याची हिम्मत होणार नाही. जर आपल्या देशात राजकीय नेत्यांविरोधात टीका व्यक्त केली जात नसेल तर आपण लोकशाही नसून हुकूमशाही आहोत असे सिसोदिया म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dNa8Zz
via IFTTT

Post a Comment

0 Comments