विधी शाखेच्या अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई : मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विधी शाखेच्या (Law Faculty) अंतिम वर्षाचे पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र १० व तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र ६ या दोन्ही परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र १० या परीक्षेचा निकाल ९८.३६ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १ हजार ५०२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणीत १३३१, द्वितीय श्रेणीत १२६ व ४५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, हे सर्व विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर या परीक्षेला एकही विद्यार्थी अनुपस्थित नव्हता. या परीक्षेत २५ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रम तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९८.६२ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ५ हजार १२८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणीत ४१५४, द्वितीय श्रेणीत ६९२ व २८२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेत ५ हजार २९७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेला ५ विद्यार्थी अनुपस्थित होते. तर या परीक्षेत ७२ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ https://ift.tt/2eryysJ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने १०२ निकाल जाहीर केले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ydHbOQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments