Also visit www.atgnews.com
रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती, १९ जुलैपर्यंत करा अर्ज
NHM Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवर विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. याअंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी २८ हजारपर्यंत पगार देण्यात येणार आहे. यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा असून १९ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १४ जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांची शैक्षणिक पात्रता, पगार हा पदानुसार वेगळा असणार आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रतेविषयी मूळ जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ही भरती राज्य शासनाची नियमित भरती नसून कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. त्यामुळे कायमस्वरुपी या पदावर राहण्याचा अधिकार नसेल याची उमेदवारंनी नोंद घ्यावी. या पदासाठी शासनाचे सेवा, नियम लागू नसतील. अर्जदार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. निवड होऊन नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर उमेदवाराने वर्तवणुकीचा दाखला देणे अपेक्षित आहे. अनुभवी आणि उच्च शिक्षण धारकास नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांच्या भरतीत बदल होऊ शकतो. याचे सर्व अधिकार अलिबाग मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज हे टपालपेटीद्वारे किंवा कार्यालयाबाहेरील अर्जपेटीतून पाठवायचे आहेत. पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय, अलिबागच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. १८ वर्ष पूर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा ३८ वर्षांची आहेत. तर राखीव वर्गासाठी ४३ वर्ष वयोमर्यादा आहे. दिनांक १९ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी आपला अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नं २१३, जिल्हा रुग्णालय, अलिबाग या पत्त्यावर दिलेल्या मुदतीत पाठवायचा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e3KKzb
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments