CBSE 12th Result: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोविड-१९ विषाणू महामारीमुळे यंदा बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. निकाल विशिष्ट सूत्रांच्या आधारे तयार करण्यात येणार आहे. बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ३० जुलै रोजी दुपारी २ वाजल्यापासून पाहता येणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने दहावी आणि बारावीचे रोल नंबर जाहीर केले आहेत. बोर्डाने (सीबीएसई) दहावी रोल नंबर २९ जुलैपासून अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ दरम्यान दहावी आणि बारावीचे विद्यार्थी विद्यार्थीनी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देणयात आलेल्या लिंकवरुन आपले रोल नंबर तपासू शकतात. सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे. बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करताना देखील बोर्डाने मीमचा आधार घेतला आहे. त्यामुळे या ट्विटला यूजर्सनीही तितकीच खोडसाळ उत्तरे दिली आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WFxMSp
via IFTTT

Post a Comment

0 Comments