Also visit www.atgnews.com
CBSE class 10, 12 board exam result: कुठे आणि कसा पाहायचा निकाल?
class 10, 12 board exam result: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डामार्फत (CBSE)दहावी आणि बारावीचा निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर केला जाणार आहे. पहिल्यांदाच या इयत्तांचे निकाल बोर्ड परीक्षेविना लागणार आहेत. CBSE बोर्डाच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे ३० लाख विद्यार्थी सीबीएसई बोर्ड परीक्षा देतात. मात्र यावर्षी कोविड-१९ विषाणू (COVID-19)महामारीच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा स्थगित केली होती. 2021: कुठे तपासावा? सीबीएसई परीक्षांचा निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर उपलब्ध होईल. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त cbseresults.nic.in वर क्लिक करू शकतात. CBSE Result 2021: कसा पाहावा? - CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल विद्यार्थ्याचा रोल नंबर, नाव आणि जन्मतारखेच्या सहाय्याने ऑनलाइन मिळवता येईल. - उमेदवारांना वर दिलेल्या संकेतस्थळांवर लॉग इन करावे लागेल, निकालाच्या पर्यायावर क्लिक करून विचारलेली माहिती भरावी लागेल. - CBSE इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ३०:३०:४० सूत्रावर आधारलेला असेल. विद्यार्थ्यांचे बारावीतले अंतर्गत मूल्यमापन, अकरावीच्या अंतिम परीक्षेतील गुण आणइ दहावीच्या बोर्ड परीक्षेतील सर्वोत्तम तीन विषयांचे गुण यावर आधारित निकाल तयार करण्यात येईल. - CBSE इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापन, शालेय स्तरावरील विविध परीक्षांमधील कामगिरी यावर आधारलेला असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3APQRRg
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments