Also visit www.atgnews.com
IGNOU BEd Result 2021: बीएड प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, इथे तपासा
BEd Entrance Result 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU)ने जानेवारी/जुलै २०२१ सत्राच्या बीएड प्रवेश परीक्षांच्या निकालाची घोषणा केली आहे. विद्यापीठाद्वारे बीएड प्रवेश परीक्षा निकाल २०२१ची घोषणा ६ जुलै २०२१ ला अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर केली गेली. ज्या उमेदवारांनी बीएड प्रोग्रामसाठी प्रवेश परीक्षा दिली होती ते आपला निकाल पाहू शकतात. तसेच बातमीखाली दिलेल्या लिंकवर जाऊन बीएड प्रवेश परीक्षा निकाल २०२१ तपासू शकतात. असा तपासा इग्नू बीएड प्रवेश परीक्षा २०२१ चा निकाल इग्नू बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड) प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी झालेले उमेदवार आपला निकाल आणि गुण तपासण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाऊन होमपेज अलर्टवर जाऊ शकतात. तिथे बीएड रिझल्ट संदर्भातील लिंक तुम्हाला पाहायला मिळेल. या लिंकवर क्लिक करा. यानंतर 'लिंक फॉर बीएड' वर क्लिक करा. त्यानंतर नव्या पेजवर आपला नोंदणी क्रमांक टाकून सबमिट करा. यानंतर उमेदवार आपला इग्नू प्रवेश परीक्षा निकाल २०२१ आणि सविस्तर गुण पाहू शकतात. जानेवारी सत्रासाठी काऊंसिलिंग लवकरच इग्नूने बीएड प्रवेश परीक्षांच्या निकालासोबतच आणखी एक महत्वाची अपडेट जाहीर केली आहे. बीएड प्रोग्राम जानेवारी २०२१ सत्र प्रवेशासाठी यशस्वी झालेल्या उमेदवारांचे काऊंसिलिंग लवकरच सुरु केले जाणार आहे. इग्नूने बीएडसाठी काऊंसिलिंग प्रक्रिया स्थानिक सेंटर्सवर सुरु केली जाणार आहे. उमेदवारांना यासंदर्भात स्थानिक किंवा क्लस्टरसाठी बनलेल्या मेरिट लिस्ट किंवा रॅंकनुसार काऊंसिलिंगसाठी बोलावले जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dOcZS6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments