Also visit www.atgnews.com
IGNOUमध्ये संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रमास सुरुवात
IGNOU Course: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू), स्कूल ऑफ ह्युमॅनिटीजने ओपन अँड डिस्टन्स माध्यमातून कम्युनिकेटीव्ह संस्कृतमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला आहे. जुलै २०२१ पासून हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेश घेऊ शकतात. १५ जुलै ही या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे. विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये सुधारणे आणि त्यांना संकृतमध्ये संवाद साधण्यास सक्षम करणे हे या कोर्सचे उद्धीष्ट्य आहे. हा कोर्स सहा महिन्यांच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. या कोर्ससाठी उमेदवाराकडे बारावी पास किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच या कोर्ससाठी १५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तसेच अर्ज फी २०० रुपये भरावी लागणार आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यार्थी इग्नूच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. इग्नूतर्फे नुकतेच नवे कार्यक्रम आणि अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मास्टर ऑफ आर्ट्स ज्योतिष (MAJY)आणि मास्टर ऑफ आर्ट्स(Drawing and Painting) (MADP) प्रोग्राम सुरु करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम दोन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती मिळवू शकतात. पुनर नोंदणीची मुदत वाढली इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी (IGNOU)ने जुलै २०२१ साठी पुनर नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवली आहे. इतर उमेदवारांसाठी जुलै २०२१ सत्रामध्ये प्रवेशाची मुदत त्याच दिवशी समाप्त होईल. विद्यार्थी इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन पुन्हा ऑनलाईन नोंदणी करु शकतात. विद्यापीठाने जून टर्म अॅण्ड परीक्षा (TEE)२०२१ साठी फॉर्म, असाइनमेंट, प्रोजेक्ट रिपोर्ट, शोध प्रबंध आणि फील्ड वर्क जनरल जमा करण्याची मुदत वाढवली आहे. जून TEE परीक्षेचा फॉर्म जमा करण्याची वेळ मुदत आधी ३० जून होती. ही आता ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यापीठाने यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hKKJRK
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments