Also visit www.atgnews.com
JNUEE 2021: एनटीएतर्फे जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या तारखेची घोषणा
2021: जवाहरलाल नेहरु प्रवेश परीक्षेसाठी (JNUEE 2021) नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. यानुसार परीक्षेचे आयोजन करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ()ने परीक्षेसााठी प्रवेश अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. २७ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. तसेच २७ ऑगस्ट रात्री ११.५० मिनिटांपर्यंत अर्ज शुल्क भरता येणार आहे. जेएनयूईई परीक्षेचे आयोजन २० सप्टेंबर पासून होणार आहे. २३ सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा सुरु राहणार आहे. परीक्षेची वेळ १८० मिनिटांची असणार आहे. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. ही एक कॉम्प्युटर आधारित परीक्षा असणार आहे. या परीक्षामध्ये सहभागी होणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार https://ift.tt/2UOFMzW वर ऑनलाइन अर्ज करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. JNUEE 2021: जवाहरलाल नेहरु प्रवेश परीक्षेसाठी अशी करा नोंदणी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2UOFMzW वर जावे. होमपेजवर 'जेएनयूईई-२०२१ ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म' लिंकवर क्लिक करा यानंतर नवे पेज खुले होईल. इथे तुम्हाला नवी नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आपल्या व्यक्तिगत आणि पात्रता निकषांची ऑनलाइन माहिती भरा यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परीक्षा शुल्क भरावे लागेल. यासोबत भविष्यातील उपयोगासाठी फॉर्मची प्रिंटआऊट काढून ठेवा. उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक नोंद करुन ठेवा. कॉम्प्युटर आधारित नोंदणी अर्जावर हा क्रमांक असणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रश्नासाठी उमेदवार ०११-४०७५९००० वर फोन करु शकतात. किंवा एनटीएचा अधिकृत मेल आयडी jnu@nta.ac.in वर लिहू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rHLu2y
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments