Maharashtra HSC Result 2021 Date: १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, आज बारावीच्या निकालाची घोषणा?

Date: महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) आज बारावीच्या निकालाची घोषणा करण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात कोणती माहिती देण्यात आली नाही. मीडिया रिपोर्टनुसार ३१ जुलैच्या आधी निकालाची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करणे गरजेचे आहे. कोर्टाने दिलेली वेळेची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण मंडळ २०२१ ची आज किंवा उद्या घोषणा करेल अशी शक्यता आहे. यावर्षी महाराष्ट्र एचएससी परीक्षा २०२१ साठी साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर होणार आहे. दहावी निकाल २०२१ च्यावेळी ही वेबसाइट बंद पडली होती. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाने हा प्रकार बारावी निकालाच्या बाबतीत होऊ नये याची काळजी घेतली आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज, ईमेल असे पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून किंवा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना याकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. बारावीतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना दहावी, अकरावी आणि बारावी अशा तीन वर्गांचे गुण विचारात घेण्यात आले आले. दहावी आणि अकरावीच्या लेखी परीक्षांचे प्रत्येकी ३० टक्के, तर बारावीचे ४० टक्के गुण गृहित धरण्यात आले आहेत. याशिवाय, बारावीचे अंतिम तोंडी परीक्षेचे गुणही विचारात घेतले गेले आहेत. बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर, याकरिता एक दिवसाची मुदतवाढही देण्यात आली. या कालावधीत बहुतांश नियमित विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर अपलोड झालेले आहेत. सुरुवातीला आलेल्या काही अडचणींनंतर बहुतांश ज्युनियर कॉलेजेसनी विद्यार्थ्यांचे गुण महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडे सादर केले आहेत. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांसंदर्भातील काही अडचणी वगळल्यास बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण आता अपलोड करण्यात आले आहेत. बारावी निकालाच्या तारखेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. मीडिया रिपोर्टनुसार बारावी निकाल २०२१ हा २ ऑगस्ट २०२१ ला जाहीर होऊ शकतो. पण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f3skPx
via IFTTT

Post a Comment

0 Comments