बारावी निकाल का लांबला? जाणून घ्या कारण...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) बारावीचा निकाल (HSC Result) अद्यापही जाहीर झालेला नसल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची प्रतीक्षा आहे. रविवारी सोशल मीडियातून सोमवारी निकाल का, तशी माहिती आहे अशा प्रकारची मेसेज होते. मात्र, मंडळाने निकालाबाबत सायंकाळपर्यंत काही स्पष्ट केलेले नव्हते. पूर परिस्थितीमुळे एक-दोन दिवस निकाल लांबल्याची माहितीही सूत्रांनी दिली. बारावीचा निकाल ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्याची सूचना राज्य मंडळाला उच्च न्यायालयामार्फत करण्यात आली होती. त्यानुसार २४ जुलैपर्यंत शाळांमार्फत निकाल निश्चित करण्याचे वेळापत्रक मंडळाने दिले होते. शाळांकडून निकाल आल्यानंतर ऑनलाइन निकाल भरताना झालेल्या चुका दुरूस्तीची प्रक्रिया मंडळात झाली. सुरुवातीला ३१ जुलै रोजी निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागात महापूर आल्यामुळे येथील यंत्रणा विस्कळीत झाली होती. त्याचसोबत सर्व काम ऑनलाइन सुरू असल्यामुळे तांत्रिक अडचणी, वीज नसणे तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्याही या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होती. याचा विचार करत एक-दोन दिवस पुढे निकाल जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. रविवारी सोमवारी निकाल असल्याबाबत हीच चर्चा सुरू होती. दिवसभर मंडळातील अधिकाऱ्यांकडेही अनेकांनी चौकशी केल्याचे कळते तसेच सोशल मीडियावरही चर्चा होती. निकालाबाबत मंडळाकडून रविवारसायंकाळपर्यंत कोणतीच स्पष्टता नव्हती. सोमवारी याबाबत मंडळ स्पष्ट करेल असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jc6SZL
via IFTTT

Post a Comment

0 Comments