Also visit www.atgnews.com
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती
2021 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI)मध्ये विविध रिक्त पदांची भरती होणार आहे. या भरती अंतर्गत शिपिंग कॉर्पोरेशनच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या ३५ जागा भरण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरतीअंतर्गत एससीआय मेन फ्लीट आणि ओएसव्ही फ्लीट पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय हे ५९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. नोटिफिकेशनसोबत उमेदवाराला अर्ज करण्यासाठी नमुना पाठवण्यात आला आहे. त्या नमुन्यानुसार उमेदवाराने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याआधी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यातील कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतर अर्ज करावा. पडताळणीमध्ये कोणती कागदपत्रे खोटी आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. तसेच नियमानुसार कारवाई करण्यात येईल. उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल असू नये. उमेदवारांना काही शंका किंवा अडचणी असल्यास संपर्क करण्यासाठी काही क्रमांक नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहेत. त्या क्रमांकावर रेझ्युमे पाठवू नये तसेच इतर कोणत्याही प्रकारचे संभाषण करु नये. तसेच १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत करोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे आहे. उमेदवारांनी दिनांक २९ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3B4RmpW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments