CBSE 10th Result Latest Update: सीबीएसई दहावीचा निकाल कधी? बोर्डाकडून ताजी अपडेट

Latest Update: सीबीएसई बोर्ड दहावी रिझल्ट २०२१ ची प्रतिक्षा या आठवड्यात संपणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने सेकेंडरी म्हणजेच दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची घोषणा या आठवड्यात करणार आहे. बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी शुक्रवारी ३० जुलैला दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागावा यासाठी काम सुरु आहे. दरम्यान बोर्डाकडून सीबीएसई दहावी निकालाची तारीख आणि वेळेची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cbse.nic.in याची माहिती मिळू शकते. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावला जाणार आहे. यासाठी आधीच्या वर्गातील गुण आणि दहावीचे अंतर्गत परीक्षांतील गुण याआधारे निकाल लावला जाणार आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे प्रत्येक विषयासाठी २० गुण अंतर्गत मुल्यांकनासाठी असतील. तर ८० गुणांचे मुल्यांकन हे वर्षभरात झालेल्या विविध परीक्षांमधील विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्सच्या आधारे दिले जातील. बोर्डाने शाळांच्या निकालास अंतिम रुप देण्यासाठी प्राचार्य आणि सात शिक्षकांची समिती बनवण्यास साांगितले होते. निकाल पाहण्यासाठी पर्याय विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर पाहू शकतात. पण विद्यार्थ्यांची अधिक संख्या पाहता तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे उमंग अॅप, आयवीआरएस (फोन करुन) आणि भारत सरकारच्या डिजिलॉकरच्या माध्यमातून निकाल पाहता येऊ शकतो. डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवर सीबीएसई सर्टिफिकेट आणि मार्कशिट उपलब्ध होईल. विद्यार्थी आपल्या स्मार्टफोनवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डिजिलॉकर अॅप डाऊनलोड करु शकता किंवा डिजिलॉकरच्या वेबसाइटवर जाऊन निकाल तपासू शकता. डिजिलॉकरच्या माध्यमातून निकाल कसा तपासायचा? हे जाणून घेऊया. स्वत:चे डिजिलॉकर अकाऊंट तयार करा Digilocker.gov.in वर रजिस्टर करण्यासाठी नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा. आपले नाव, जन्म तारीख आणि इतर वैयक्तिक माहिती भरा. आपला मोबाइल नंबर आणि ६ अकांचा सिक्योरीटी पिन नंबर सेट करा. आता आपला ईमेल आयडी, आधार नंबर टाका आणि सबमिट करा on DigiLocker:असा तपासा स्टेप १- सर्वात आधी डिजिलॉकरची अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in वर जा स्टेप २- होमपेजवर एज्युकेशन सेक्शनमध्ये सीबीएसईवर क्लिक करा स्टेप ३ - दहावी क्लास मार्कशीट किंवा दहावी पासिंग सर्टिफिकेटवर क्लिक करा स्टेप ४ - आता रजिस्टर मोबाइलच्या मदतीने २०२१ तपासा स्टेप ५ - रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढा सीबीएसई दहावीचा निकाल २०२१ निकालाची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थी आपला रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर महत्वाची माहिती टाइप करुन आपला रिझल्ट पाहू शकतात. यासाठी रोल नंबर कसा मिळवायचा याची माहिती घेऊया. 10th Roll Number: असा करा डाऊनलोड स्टेप १ - सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा स्टेप २- होमपेजवर स्क्रोल करा ‘Roll Number Finder 2021’ लिंकवर क्लिक करा स्टेप ३ - सर्व ऑप्शन सिलेक्ट करा पुढच्या पेजसाठी ‘Continue’ वर क्लिक करा स्टेप ४ - दहावीचा पर्याय निवडा आणि मागितलेली माहिती भरा. आपले नाव, आई-वडिलांचे नाव, जन्म तारीख अपडेट करा स्टेप ५- स्क्रीनवर सर्च डेटावर क्लिक केल्यावर रोल नंबर समोर येईल स्टेप ६ - डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट काढून ठेवा १८ लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार यावर्षी सीबीएसई दहावीच्या साधारण १८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सीबीएसई दहावी परीक्षा ४ मे ते ७ जून २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. पण करोना प्रादुर्भावामुळे ती रद्द करण्यात आली. त्यानंतर आता सीबीएसई बोर्डातर्फे अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lhVj60
via IFTTT

Post a Comment

0 Comments