FYJC Online Admission: पहिल्या फेरीच्या प्रवेशांना मुदतवाढ

मुंबई: राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिक या पाच महानगर क्षेत्रात अकरावी प्रवेशांसाठी (FYJC Online Admission 2021) विविध कागदपत्रे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी सादर करायची आहेत. त्यामुळे प्रवेश निश्चितीसाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिल्या यादीनुसारचे प्रवेश घेता येतील. ही मुदत सोमवारी ३० ऑगस्ट रोजी संपत होती. ज्या विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रवर्गानुसार प्रवेश अलॉट झाले असतील त्यांच्यासाठी शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांनुसार, शिक्षण संचालकांनी काही सूचना जारी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे - - ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळालेला आहे, त्यांना जात प्रवर्गाबाबत कोणतीही कागदपत्रे सादर करायची आवश्यकता नाही. - ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे, त्यांनी त्या प्रस्तावाची पोच आणि सोबत वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास असे विद्यार्थी त्या प्रवर्गातून प्रवेशासाठी पात्र असतील. - ज्या विद्यार्थ्यांकडे स्वत:चे जात प्रमाणपत्र तसेच प्रस्तावाची पोच दोन्ही नाहीत, त्यांनी प्रवेशासाठी वडिलांचे जात प्रमाणपत्र आणि हमीपत्र सादर केल्यास असे विद्यार्थी त्या प्रवर्गातून प्रवेशासाठी पात्र असतील. - हमीपत्र दिलेल्या तसेच प्रस्तावाची पोच दिलेल्या विद्यार्थ्यांना ३० दिवसात स्वत:चे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील, अन्यथा अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील. - VJ/NT, OBC, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासोबत उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (NCL)सादर करणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी हमीपत्र घेऊन ३० दिवसांची मुदत देण्याबाबत पूर्वी संकेतस्थळावर दिलेल्या सूचना कायम राहतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zwhWYy
via IFTTT

Post a Comment

0 Comments