GATE 2022 परीक्षेसाठी नोंदणीला सुरुवात, जाणून घ्या डिटेल्स

2022: ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) २०२२ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच ३० ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट आयआयटी खडगपूर- iitkgp.ac.in, gate.iitd.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ()साठी अर्ज करू शकतात. या वेळी गेट २०२२ ची परीक्षा आयआयटी खडगपूर च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. उमेदवारांना २४ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे. १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. उमेदवार एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात पण एकच अर्ज भरला जाईल. Date: गेट २०२२ परीक्षा केव्हा? गेट २०२२ परीक्षेचे आयोजन ५ फेब्रुवारी, ६ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारी २०२२ ला केले जाणार आहे. आयआयटी खडगपूरने दिलेल्या माहितीनुसार, करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वेळापत्रकामध्ये बदल देखील केला जाऊ शकतो. schedule: पाहा संपूर्ण वेळापत्रक गेट २०२२ साठी ऑनलाइन नोंदणी सुरुवात- ३० ऑगस्ट २०२१ रेग्यूलर ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख- २४ सप्टेंबर २०२१ लेट फीससहित नोंदणीची शेवटची तारीख- १ ऑक्टोबर २०२१ परीक्षेची तारीख-५,६,१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ गेट रिझल्टची तारीख- १७ मार्च २०२२ GATE 2022 registration: अशी करा नोंदणी गेट २०२२ नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागणार आहे. गेट २०२२ ची वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जावे लागेल. तुम्ही एक किंवा दोन पेपर्ससाठी अर्ज करु शकता. पण एकच अर्ज भरला जाईल. जर तुम्ही एकाहून अधिक अर्ज भरले तर स्वीकारले जाणार नाहीत. इतर अर्ज रद्द केले जातील आणि त्याचे शुल्क परत केले जाणार नाही. गेट २०२२ नोंदणी शुल्क एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क ७५० रुपये आहे. लेट फीससहित एकूण फीस- १ हजार २५० रुपये इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- १ हजार ५०० रुपये लेट फीससहित २ हजार रुपये शुल्क भरावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38qgg6Y
via IFTTT

Post a Comment

0 Comments