RRC Group D Exam Date 2021: रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षा कधी? जाणून घ्या अपडेट

RRC Group D Exam Date 2021: आरआरसी ग्रुप डी परीक्षेच्या तारखेची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) तर्फे आतापर्यंत सर्वात मोठी परीक्षा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) चे ७ टप्पे ३१ जुलै २०२१ ला पूर्ण झाले. आता रेल्वे भरती सेल (RRC)च्या ग्रुप डी भरतीसाठी परीक्षेचे अपडेट लवकरच जाहीर केले जाणार आहेत. रेल्वेतर्फे डिसेंबर २०२० मध्ये दिलेल्या मााहितीनुसार आरआरसी ग्रुप डी भरती परीक्षेची प्रक्रिया आरआरबी एनटीपीसी परीक्षा संपल्यानंतर सुरु केली जाईल. आरआरबी एनटीपीसी भरतीचे नोटिफिकेशन २०१९ मध्ये जाहीर करण्यात आले होते. आरआरसीतर्फे ग्रुप डी (लेवल १) च्या एक लाखहून अधिक (१ लाख ३ हजार ७३९) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन (RRC-01/20219) देखील २०१९ च्या सुरुवातीस जाहीर करण्यात आले होते. याची अर्ज प्रक्रिया १२ मार्च ते १२ एप्रिल २०१९ पर्यंत सुरु होती. आरआरसी ग्रुप डी (लेवल १) भरतीसाठी निर्धारित निवड प्रक्रियेच्या अंतर्गत कॉम्प्युटर आधारित परीक्षा (सीबीटी)चे आयोजन सप्टेंबर/ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार होती. पण देशभरात करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा अद्याप झाली नाही. ९० मिनिटांची असेल आरआरसी (ग्रुप डी-लेवल १) सीबीटी आरआरसी ग्रुप डी भरती नोटिफिकेशननुसार रेल्वे ग्रुप जी (लेवल १) साठी होणारी कॉम्प्युटर आधारित परीक्षा ९० मिनिटांची असेल. परीक्षेमध्ये सामान्य विज्ञानाचे २५ प्रश्न, गणिताचे २५ प्रश्न, सामान्य बुद्धिमत्ता आणि रिजनिंगचे ३० प्रश्न आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडींवर २० प्रश्नांसहित एकूण १०० प्रश्न विचारले जातील. परीक्षेमध्ये तीनास एक असे निगेटीव्ह मार्किंग देखील असणार आहे. कॉम्प्युटर आधारित परीक्षेतील परफॉर्मन्सच्या आधारे उमेदवारांना शारीरिक दक्षता परीक्षा (PET) साठी बोलावले जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेचे आयोजन केले जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vsxa24
via IFTTT

Post a Comment

0 Comments