वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

VAMNICOM Recruitment 2021: भारत सरकारच्या कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याअंतर्गत अनुदानित मदत संस्था असलेल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेत ही भरती होणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. इच्छुक उमेदवार ७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. या पदभरती अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकेत लिपिक पदांच्या एकूण २५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी असणे गरजेचे आहे. यासाठी वयोमर्यादा २१ वर्षांपेक्षा अधिक आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावी. फ्रेशर्स उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. जे कर्मचारी आधी विद्या सहकारी बॅंकेत काम करत असतील त्यांच्यासाठी वयोमर्यादेत ४० वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. विद्या सहकारी बॅंकेच्या पे स्केल नियमानुसार पगार देण्यात येईल. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील एम्प्लॉयमेंट सेक्शनमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. यासाठी १ हजार रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. ऑनलाइन माध्यमातून आलेल्या अर्जांचाच विचार केला जाणार आहे. अर्ज करताना ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर योग्य रितीने नोंद करावा आणि ते सुरु असतील याची काळजी घ्या. चुकीची कागदपत्रे आढळल्यास उमेदवार अपात्र करण्यात येईल. अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबरपासून सुरु झाली असून ७ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया ( , SAI) मध्ये विविध पदांच्या एकूण २२० पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाअंतर्गत विविध खेळांच्या (SAI)सहाय्यक प्रशिक्षक भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील त्यामध्ये देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येत आहे. प्रशिक्षकांची भरती चार वर्षांच्या प्राथमिक कालावधीसाठी केली जाणार आहे. वार्षिक कामगिरी मूल्यांकनाच्या आधारे या कालावधीसाठी ही भरती होईल. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युडो, कबड्डी, रोइंग, शूटिंग, स्विमिंग, टेबल टेनिस, ताइक्वांडो, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती यासह २१ विविध क्रीडा प्रकाराच्या प्रशिक्षकपदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kTRsvd
via IFTTT

Post a Comment

0 Comments