'खासगी शाळांच्या सॅनिटायझेशनची जबाबदारी महापालिकेने झटकली'

मुंबई: केवळ पालिकेच्या शाळांचे निर्जंतुकीकरण करून खासगी शाळांची जबाबदारी झटकून मुंबई महानगरपालिका () विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करून मुंबईतील लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप भाजपा शिक्षक आघाडीने केला आहे. ४ ऑक्टोबर पासून मुंबईतील शाळां सुरू करण्यास () मुंबई महापालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला आहे. बुधवारी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले आहे या परिपत्रकात शाळा सुरू करण्याबाबत शाळांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. शाळा सुरू करण्याआधी मुंबई महापालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या साहाय्याने सोडिअम हायपोक्लोराईड सोल्युशनने निर्जंतुकीकरण करून घ्यावे, असे यात म्हटले आहे. मात्र इतर खासगी व्यवस्थापनाच्या शाळांची निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी पालिकेने झटकली असून ती खाजगी शाळांवर टाकली आहे हा एकप्रकारचा भेदभाव असून खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व सेल्फ फायनान्सच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी पालिका खेळ करीत असल्याचा आरोप भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केला आहे. या खाजगी व्यवस्थापनाच्या विविध शाळांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीचे पाच लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत या ५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे पालक मुंबई महानगर पालिकेचा नियमित कर भरणारे आहेत मग या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी पालिकेने घ्यायला पाहिजे मात्र पालिका व्यवस्थापन यामध्ये भेदभाव करीत असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला आहे. एकीकडे खाजगी अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान मिळाले नसून त्यामध्ये कपात केल्याने शाळा सुरू करण्याच्या पूर्व तयारीला निधी कसा उपलब्ध करावा या चिंतेत शाळा व्यवस्थापन आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kSKAhG
via IFTTT

Post a Comment

0 Comments